Duck Farming: येरुकला : बदकपालन करणारा भटका समाज

आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथील भातशेतीचा हंगाम संपला होता, पण तरीही भातशेतीत पाणी भरलेले होते. पाऊस यायला अजूनही अवकाश होता. संध्याकाळी ती भातशेती, त्यात भरगच्च भरलेले पाणी आणि त्यावर तरंगणारा पालापाचोळा असे दृश्य लांबून मला दिसत होते पण जवळ गेलो तर चित्र काही वेगळेच होते…. तो पालापाचोळा नसून असंख्य बदकं होती.
